श्रीक्षेत्र आडगाव येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव मोठ्या उत्साहात

0

नाशिक : प्रतिनिधी

परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन व धर्मवार्ता सोहळा रविवारी (दि. १३ )  श्रीक्षेत्र आडगाव (जि. नाशिक) येथील भगवान श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थानावर अतिशय भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. याप्रसंगी नाशिक जिल्ह्यासह विविध भागांतून आलेले संत-महंत, उपदेशी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​     कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ५ वाजता आरतीने झाली. त्यानंतर पहाटे ५.२० ते ६ या वेळेत स्थानास व श्री मूर्तीस मंगलस्नान घालण्यात आले. सकाळी ९ ते १० या वेळेत ध्वजारोहण आणि दीपप्रज्वलन सोहळा पार पडला. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत भाविकांच्या उपस्थितीत धर्मसभा पार पडली, ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मान्यवर संत-महंतांची प्रमुख उपस्थिती व निरूपण लाभले. दुपारी १२ वाजता भगवान श्री चक्रधर स्वामी जन्मोत्सव सोहळा, महाआरती व उपहार विधी संपन्न झाला, तर दुपारी १ वाजेपासून उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या धर्मसभेस महंत कै. सुकेणेकर बाबा (मौजे सुकेणे) यांच्या प्रेरणेने विविध पूजनीय संत महंतांची उपस्थिती लाभली. यामध्ये महंत परसराज बाबा (चौरांगस्थान आडगाव), मुरारीमल्ल बाबा कारंजेकर, अर्जुनआप्पा सुकेणेकर, बाळकृष्ण नाना सुकेणेकर, भिमराज दादा सुकेणेकर, रामदास बाबा सुकेणेकर, गोपीराज बाबा सुकेणेकर, दत्तराज बाबा सुकेणेकर आणि श्रीधरनंद बाबा सुकेणेकर यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रवचक म्हणून समाधान बाबा सुकेणेकर (वडगाव लांडगा, संगमनेर) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर (नाशिकरोड) यांनी केले. या सोहळ्याला माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी सभापती गणेश गीते, आमदार राहुल ढिकले , आमदार गोकुळ गीते, महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, ना. रोड देवळाली व्यापारी बँकेचे चेअरमन दत्ता गायकवाड, माजी नगरसेवक ॲड. नामदेव शिंदे, ऋद्धेश निमसे, नगरसेविका ऐश्वर्या जेजुरकर, इंदुबाई खताळे, ॲड. जे. टी. शिंदे, सुनिता भोजने, नगरसेवक विशाल संगमनेरे, शितल माळोदे तसेच महानुभाव अखिल विश्व भोपे समाज अध्यक्ष ज्योतिषाचार्य  प्रभाकर आप्पा भोजने आदी प्रमुख मान्यवरांनी उपस्थित राहून लावून दर्शन घेतले.
​        या सोहळ्याचे आयोजन प्रणित सानप व परिवार  तसेच निमंत्रक  भास्कर महानुभाव, गोपाळ महानुभाव, पंकज  महानुभाव, मयुर  महानुभाव आणि आडगाव पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.