नाशिक : प्रतिनिधी
येथील गोवर्धन परिसरातील श्री दत्त मंदिर ट्रस्टच्यावतीने भगवान श्रीचक्रधर स्वामी अवतार दिनोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्री दत्त मंदिर ट्रस्ट (गोवर्धन, गंगापूर), सर्वज्ञ सेवा वासणीक मंडळ आणि पंचकृष्ण प्रबोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या धार्मिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाची सुरुवात सकाळी ६ ते ९ या वेळेत देवास मंगलस्नान, श्रीचक्रधर पाठ पारायण, श्रीमूर्तीपूजन व विडाअवसर या धार्मिक विधींनी झाली. त्यानंतर सकाळी ९ वाजता ध्वजारोहण, दीपप्रज्वलन, धर्मसभा व ज्ञानसत्र पार पडले.
सकाळी ११ वाजता श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवाचा मुख्य सोहळा उत्साहात पार पडला. दुपारी १२ वाजता महाआरती झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक तथा अखिल भारतीय परिषदेचे संयोजक दिनकर आण्णा पाटील यांनी केले. याप्रसंगी भागवताचार्य महंत चिरडे बाबा (निफाड), महंत कृष्णराजबाबा मराठे (गंगापूर), ई.भा. भाईदेवमुनी महानुभाव, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह विविध मान्यवरांनी भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी अखिल विश्व भोपे पुजारी महानुभाव प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिषाचार्य प्रभाकर आप्पा भोजने, राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण महानुभाव -भोजने, राजेंद्र जयभावे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात भाविक, पुजारी, उपदेशी, वासनिक परिवार उपस्थित होता. महाआरती करून संपन्न करण्यात आला, त्यानंतर भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
—
गंगापूर येथे श्री चक्रधर स्वामी अवतार दिन उत्सव उत्साहात
Get real time updates directly on you device, subscribe now.