नाशिक : प्रतिनिधी
शिक्षक दिनाचे औचित्य साधून नाशिक व मुंबई येथे कार्यरत असणाऱ्या श्री योग ग्लोबल फाउंडेशनच्यावतीने राज्यस्तरीय साने गुरुजी आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार २०२६ आणि ‘साने गुरुजी बहुआयामी सेवा गौरव पुरस्कार २०२६ वितरण सोहळा उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रा. श्रीकांत सोनवणे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर व नगरसेवक गुरमीतसिंग बग्गा, जगद्गुरु कल्कीराम महाराज आणि श्री योग ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत गीते विराजमान होते.
श्री योग ग्लोबल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अविनाश वाळुंजे यांनी प्रास्ताविक केले. अविनाश वाळुंजे यांनी मान्यवरांचा आणि सत्कारार्थींचा परिचय करून दिला.
प्रा. श्रीकांत सोनवणे म्हणाले की, समाजात शिक्षकांचे स्थान आदराचे व अबाधित आहे. ज्ञानदानासोबतच जनगणना, निवडणुका व विविध शासकीय उपक्रमांत शिक्षकांचा सक्रिय सहभाग हे त्यांच्या देशभक्तीचे अनोखे उदाहरण आहे. प्राचीन काळात राजालाही दंडित करण्याचा अधिकार गुरूलाच होता. आजच्या काळात ग्लोबल होण्यासाठी विविध भाषांचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे.
माजी उपमहापौर बग्गा यांनी, शिक्षक हा समाजातील अत्यंत विश्वासू घटक असल्याचे सांगत साने गुरुजींच्या देशसेवेतील योगदानाचा गौरव केला.
जगद्गुरु कल्कीराम महाराज यांनी आदिनाथ संप्रदायाच्या आध्यात्मिक कार्याची माहिती देऊन धार्मिक कार्यावरील अतिरिक्त खर्च कमी करून शैक्षणिक कार्यासाठी निधी वापरण्याचे आवाहन केले.
यावेळी दत्तात्रय कोठावदे यांनी साने गुरुजींच्या वेशात गोदमाईची पत्रवारी सादर करून उपस्थित शिक्षक आणि मान्यवरांना उद्बोधीत केले.
या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला:
साने गुरुजी आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार २०२६ प्राप्त असे : संयुक्ता हेमंत कुलकर्णी, विवेक अनंत केळकर, अनिल गबाजी वाघ, पद्मा विठ्ठल काळे, सुभाष उखा ठाकरे, सुवर्णा जनार्दन उनवणे, बबीता दिलीप सूर्यवंशी, प्रदीप अशोक पेखळे, हरिराम महादू गावित, नंदा सोपान सरगर, शरद तुकाराम शिंदे.
साने गुरुजी बहुआयामी सेवा गौरव पुरस्कार २०२६ प्राप्त असे : चिंतामण संतोष उगलमुगले, मंदा प्रकाश फड, सुनिता भास्कर सोनवणे, नानासाहेब उत्तमराव बच्छाव, संतोष रावसाहेब देशमुख व अर्चना संतोष देशमुख, सुनील वसंतराव राजगुरू, रामेश्वर केशव हालगे, विजय शंकर कांदळकर.
तसेच समाजासाठी आर्थिक सुरक्षितता अभियान राबविणाऱ्या सुरक्षा वेल्थ केअर ग्रुपच्या अविनाश वाळुंजे, रत्नेश महाले, स्नेहल वारके आणि सपना गोम्स-शेटे यांचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यास नाशिक शहर व जिल्ह्यातील नागरिक, शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री योग ग्लोबल फाउंडेशनचे सचिव ज्ञानेश्वर सुरासे, सागर वाबळे, अनिल आहेर, गायत्री बोडके, मनोज नवाळे, स्नेहा कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. अविनाश वाळुंजे यांनी प्रास्ताविक केले. जयश्री धात्रक यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत गीते यांनी आभार मानले.
—