नाशिक : प्रतिनिधी
विद्योत्तमा फाउंडेशन, नाशिकच्या महिला समितीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विद्या चिटको होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून दीपाली जाधव, तर विशेष अतिथी म्हणून डॉ. रोचना भारती उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात कल्पना पुराणिक यांनी सादर केलेल्या सरस्वती वंदनेने झाली. त्यानंतर पविका आणि वेदिका यांनी गणपती गीत सादर करून वातावरण भक्तिमय केले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘रिश्तों का रिमोट’ आणि ‘आखिरी डिलीवरी’ ही दोन नाटके होती. कलाकारांच्या प्रभावी आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. दोन्ही नाटकांमधून आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीचे, नातेसंबंधांतील बदलत्या संवेदनांचे आणि जीवनातील वास्तवाचे प्रभावी चित्रण करण्यात आले. या सादरीकरणांचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले. तसेच अबोली हिने सादर केलेल्या मनमोहक नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी संस्थेशी नव्याने जोडल्या गेलेल्या सर्व सदस्यांचे स्वागत उपाध्यक्ष ठाकुर भरत सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सादर करण्यात आलेले ‘मिले और तुम्हारा हमारा’ हे समूहगीत विशेष आकर्षण ठरले. प्रादेशिक वेशभूषेत सजलेल्या महिलांची उपस्थिती आणि भारतीय सैन्यदलाच्या तिन्ही दलांतील जवानांचा सहभाग यामुळे या गीताला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. या सादरीकरणातून राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक विविधता आणि देशप्रेमाची भावना प्रभावीपणे व्यक्त झाली.
अनिता दुबे यांनी सूत्रसंचालन केले, शीतल देवकर यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम सांस्कृतिक समृद्धी, सामाजिक जाणीव आणि उत्साह यांचा सुंदर संगम ठरला.
—