नाशिक : प्रतिनिधी
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त श्री रामलीला एज्युकेशन सोसायटीतर्फे महाराष्ट्र अहिल्यारत्न पुरस्कार सन्मान सोहळा – 2026 आयोजित केलेला आहे. सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात केलेल्या योगदानची दखल घेऊन ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरे यांना महाराष्ट्र अहिल्या रत्न पुरस्कार – 26 पुरस्कार संस्थेच्यावतीने पुरस्कार घोषित केलेला आहे.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी ब्रम्हाकुमारी पुष्पा दीदी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून तेजश्री आंबेकर, सहायक पोलीस निरीक्षक सातपूर आहेत. 25 ऑक्टोबरला नाईस संकुल, सातपूर, नाशिक येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री रामलीला एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष शिल्पा झरेकर, अध्यक्ष अरुणा दरगुडे व सचिव रंगनाथ दरगुडे यांनी केले आहे.
—
ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरे यांना महाराष्ट्र अहिल्यारत्न पुरस्कार घोषित
Get real time updates directly on you device, subscribe now.