विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील संधी ओळखून स्वतःला विकसित करावे : डॉ. विलास सपकाळ

0

नाशिक  : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी योग्य वेळेचे नियोजन करून आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून, काळाप्रमाणे बदल स्वीकारून स्वतःला विकसित करावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. विलास सपकाळ, कुलगुरू, एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी केले.
अशोका एज्युकेशन फाऊंडेशन उच्च शिक्षण आयोजित ‘स्टुडंट्स रिसर्च प्रोजेक्ट स्कीम’ (एसआरपीएस) अंतर्गत पारीतोषिक वितरण सोहळा आणि माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
या समारंभात अशोका बिझनेस स्कूल (एबीएस), अशोका सेंटर फॉर बिझनेस अँड कॉम्प्युटर स्टडीज (एसीबीसीएस), अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज अँड रिसर्च (एआयसीईएसआर) आणि अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन (एसीई) संस्थेमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संशोधन ‘स्टुडंट्स रिसर्च प्रोजेक्ट स्कीम’ (एसआरपीएस) प्रकल्पना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी श्री बालाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. जी. के. शिरुडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी एसआरपीएस या स्पर्धेबद्दल आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक्त केले. तसेच शिक्षणाचा उद्देश, विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपी शिक्षण घ्यावे याविषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे संचालक सतीश पारख यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शोभा वाढवली. याशिवाय संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. एम. गुजराथी हे मान्यवर देखील उपस्थित होते.

                 विचारप्रवर्तक नाटकाचे सादरीकरण
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधून अशोका महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांकडून एक अर्थपूर्ण सामाजिक संदेश देण्यासाठी नशामुक्त व्हा नया सवेरा (जनजागृती)’ या संकल्पनेखाली विद्यार्थ्यांनी तरुणांवर होणाऱ्या अमली पदार्थांच्या सेवनाच्या घातक परिणामांवर आणि निरोगी व जबाबदार जीवन जगण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकणारे एक विचारप्रवर्तक नाटकाचे सादरीकरण केले. या नाटकाने व्यसनमुक्त यशस्वी जीवनाच्या सकारात्मक प्रभावावर भर दिला.
वाढदिवस साजरा
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. त्यांनी अभिष्टचिंतनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या सामाजिक संदेश देणाऱ्या नाटकाचे व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
एसआरपीएस पुरस्कार वितरण
याशिवाय कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे स्टुडंट्स रिसर्च प्रोजेक्ट स्कीम’ (एसआरपीएस) पुरस्कार वितरण सोहळा, ज्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये संशोधन संस्कृती विकसित करण्याचा उद्देशाने अशोका एज्युकेशन फाउंडेशनतर्फे स्टुडंट्स रिसर्च प्रोजेक्ट स्कीम’ (एसआरपीएस) हा उपक्रम राबवला जातो, त्याअनुषंगाने तरुण संशोधकांच्या मौल्यवान योगदानाचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी उत्कृष्ट विद्यार्थी संशोधन प्रकल्पांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गुणवंतांचा सत्कार
तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि योगदानाबद्दल, उद्योजक, विविध बहुराष्ट्रीय कंपन्यामधील उच्च अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अशोका महाविद्यालयांचे माजी विद्यार्थी, तसेच चारही उच्च शिक्षण संस्थांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील यानिमित्ताने सत्कार करण्यात आला.
पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
अमली पदार्थांच्या गैरवापराचे धोके आणि निरोगी जीवनाबद्दल विद्यार्थ्यांना व समाजाला शिक्षित करण्यासाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन अशोका महाविद्यालयातील विद्यार्थांसाठी करण्यात आले होते. त्यानुसार उल्लेखनीय पोस्टर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांदेखील मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याशिवाय वृक्षारोपण, रक्तदान शिबिर यांसारखे अमली पदार्थ विरोधी जनजागृती उपक्रम अशोकाच्या वेगवेगळ्या महाविद्यालयामंध्ये आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे आयोजन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांच्या मार्गदर्शनाखाली एईएफ-एचई अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. प्रीती सोनार, एबीएसचे संचालक डॉ. सुनील डोके, एसीबीसीएसच्या प्रभारी प्राचार्या डॉ. हर्षा पाटील, एआयसीईएसआरच्या प्रभारी प्राचार्या डॉ. सरिता वर्मा आणि एसीईच्या प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके यांनी केले.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी विद्यार्थी, विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांनी अथक परिश्रम घेतले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.