गोष्टींमधून जुळले नात्यांचे बंध

0

नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी ‘अलाबलू – द लॉस्ट एलियन’ (हरवलेला परग्रहवासी) या गोष्टीच्या माध्यमातून एक आनंददायी आणि कल्पनाशक्तीला चालना देणारा अध्ययनानुभव घेतला.
या रंजक गोष्टीतून विद्यार्थ्यांना दयाळूपणा, मदतशीलता, मैत्री आणि इतरांची काळजी घेण्याचे महत्त्व समजले. हरवलेल्या किंवा अडचणीत असलेल्या व्यक्तींना मदत करावी तसेच प्रत्येकाशी प्रेमाने आणि समजूतदारपणे वागावे, हा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांना मिळाला. या गोष्टीमुळे त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळाली आणि स्वतःचे विचार व्यक्त करण्याची तसेच इतरांप्रती सहानुभूती बाळगण्याची वृत्ती विकसित झाली.
      या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या व्यक्तिचित्र रेखाटनाच्या कृतीतून विद्यार्थ्यांनी गोष्टीतील पात्रे चित्रांच्या माध्यमातून साकारली. त्यामुळे त्यांना गोष्टीचे आकलन व्यक्त करण्याची संधी मिळाली आणि त्यांचे शिक्षण अधिक रंजक व संस्मरणीय बनले.
—

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.