युडब्ल्यूसीईसीत नर्सरी समारोप दिन उत्साहात

0

नाशिक : प्रतिनिधी
सिडकोतील अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये `द लिटल मीʼ या संकल्पनेवर आधारित नर्सरी समारोप दिन उत्साहात झाला. कार्यक्रमाची सुरुवात शरीराचे अवयव आणि निरोगी सवयींवर आधारित गोड नाटिकेने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी फॉनिक्सवरील गाणी, आत्मविश्वासाने केलेले अंकमोजणीचे सादरीकरण आणि विविध उपक्रमांद्वारे आपले कौशल दाखविले.

विद्यार्थ्यांनी मनमोहक गीत आणि नृत्य सादर केले. त्यांच्या प्रत्येक हालचालीत गेल्या एका महिन्यात झालेली प्रगती, आत्मविश्वास आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. लाजाळू स्वरातून आत्मविश्वासपूर्ण अभिव्यक्तीकडे झालेला त्यांचा प्रवास उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

हा समारोप दिन बालवयातील शिक्षण हे केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते मर्यादित नसून, स्वतःला व्यक्त करणे, संघभावना विकसित करणे आणि आत्मविश्वास वाढविणे यासाठी तितकेच महत्त्वाचे असल्याचा संदेश देणारा ठरला. या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच अनेक व्यासपीठांवर यशस्वी वाटचाल करावी, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.