नाशिक : प्रतिनिधी
सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये बुधवारी (दि. १६ सप्टेंबर) हिंदी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या विविध कलाविष्कारांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.
विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी प्रेम, आदर आणि अभिरुची निर्माण करणे, हिंदीचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच तिच्या संवर्धन व प्रसारासाठी प्रेरणा देणे, हा कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या मनमोहक स्वागत नृत्याने झाली. हिंदी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत शिवम भामरे यांनी वर्तमानकाळाबरोबरच भविष्यातही हिंदी भाषेच्या संवर्धनाची व प्रसाराची गरज व्यक्त केली. त्यानंतर विद्यालयाच्या गायक वृंदांनी हिंदी भाषेचे महत्त्व पटवून देणारे सुंदर गीत सादर केले.
इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थिनींनी माता – पित्यांच्या सन्मानार्थ सादर केलेल्या सुंदर नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या शेवटी आराध्या मोरे हिने आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि हिंदी भाषेविषयीची अभिरुची यामुळे हिंदी दिवसाचा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
—