डॉ. शहाणे बंधूंचे लिखाण संशोधकांसाठी उपयुक्त : खडसे

0

नाशिक  : प्रतिनिधी
प्रा. डॉ. राजेंद्र शहाणे आणि प्रा. डॉ. कृष्णा शहाणे यांनी लिहिलेल्या `संशोधन पद्धतीच्या मूलभूत संकल्पनाʼ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे, माजी अर्थ व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे स्वीय सचिव योगेश कोलते, प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे, डॉ. राजेंद्र शहाणे, डॉ. शिवचरण उज्जैनकर, गणेश कोळी, सार्थक शहाणे, डॉ. प्रीती शहाणे, डॉ. जयश्री शहाणे आदी उपस्थित होते.
बिटको महाविद्यालय, नाशिक रोड येथील प्रभारी प्राचार्य आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. कृष्णा शंकर शहाणे आणि त्यांचे बंधू बी. वाय. के. महाविद्यालयातील प्रा. डॉ. राजेंद्र शंकर शहाणे यांनी संयुक्तरीत्या लिहिलेल्या अर्थशास्त्रावरील 16 व्या पुस्तकाचे प्रकाशन मुक्ताईनगर येथे झालेल्या समारंभात नुकतेच करण्यात आले.

याप्रसंगी मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, आजच्या युगात संशोधन हा सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे. कोणत्याही क्षेत्रात प्रगल्भतेकडे वाटचाल करण्यासाठी संशोधन महत्वाचे आहे. तसेच संशोधनातून स्पर्धाक्षमता वाढण्यास मदत होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.