नाशिक : प्रतिनिधी
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आर्थिक आणि गुंतवणूक साक्षरता या विषयावर चार्टर्ड अकाउंटंट प्रसन्ना पांगम यांची व्याख्यान झाले.
पांगम यांनी प्रशिक्षणार्थ्यांना आत्तापासूनच आर्थिक गुंतवणुकीचा, भविष्यकाळासाठी बचत करण्याची सवय लावावी, असे सांगितले. तसेच कुणीतरी सांगितले म्हणून त्यावर लगेच विश्वास ठेवू नये, तर त्या कंपनीविषयी माहिती घेऊन मगच आर्थिक गुंतवणूक करावी, असा सल्ला दिला.
ते म्हणाले की, आजचा प्रशिक्षणार्थी उद्याचा कुशल कारागीर असेल, पण केवळ कौशल्याने पैसे कमवता येतात, तर आर्थिक साक्षरतेने तो पैसा टिकवता येतो.
याप्रसंगी मंचावर आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे, गटनिदेशक उमेश पालवे, निदेशक दीपक साळवे, आनंद जाधव, मधुकर सानप, संदीप काजळे, सुशील लोकरे, गोकुळ बेदाडे, मोहन पवार, योगेश गांगोडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
—