क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक आयटीआयमध्ये कौशल्य दीक्षांत समारंभ उत्साहात

0

नाशिक : प्रतिनिधी
केवळ पुस्तकी ज्ञानाने नव्हे तर कौशल्य मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, याची प्रचिती नाशिकच्या शरणपूर रोड येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्था संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित कौशल्य दीक्षांत समारंभातून आली.
अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै 2026 मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा कौशल्य दीक्षांत समारंभ सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर 2026) आनंददायी वातावरणात झाला.
आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती आणि क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्राचार्य काळे यांनी प्रास्ताविकात उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक केले. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले. तसेच इतर शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत आयटीआयमधून तांत्रिक कौशल्य आत्मसात केलेले प्रशिक्षणार्थी अल्पावधीत रोजगाराच्या संधी मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहत असल्याचे त्यांनी नमूद केले

         आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर त्या पदवीला कौशल्याची जोड असणे आवश्यक आहे. मेहनत, शिस्त, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर प्रत्येकाने आपल्या स्वप्नांना यशाचे पंख द्यावेत आणि आयुष्यात यशाची उत्तुंग शिखरे गाठावी असे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांचा प्राचार्य काळे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान आणि उज्वल भविष्याची नवी उमेद दिसून येत होती.
याप्रसंगी मंचावर निदेशक दीपक साळवे, तसेच कार्यक्रमाला निदेशक मधुकर वाघेरे, मधुकर सानप, संदीप काजळे, महेश बोडके, गोकुळ बेदाडे, योगेश गांगोडे, अजय पवार, सोनाली खिराडी, मोहन पवार, सुशील लोहकरे, जयेश शिंदे, श्रीमती भारती नागरे, राहुल सानप आदी कर्मचारी उपस्थित होते.
निदेशक आनंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. निदेशक संदीप काजळे यांनी आभार मानले.
कौशल्यातून रोजगार, रोजगारातील स्वावलंबन आणि स्वावलंबनातून उज्वल भविष्य या ध्येयाचा संदेश देणारा हा कौशल्य दीक्षांत समारंभ प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रेरणा, अभिमान आणि नव्या संकल्पनांचा अविस्मरणीय सोहळा ठरला.
—

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.