नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रकाशपर्व दिवाळी मोठ्या उत्साहात, सर्जनशीलतेने आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले आकाशकंदील, तोरणे, माळा तसेच विविध सजावटीच्या वस्तूंचे आकर्षक सादरीकरण केले.
दिवाळीच्या आनंदोत्सवासोबतच विद्यार्थ्यांना फटाके न फोडण्याचे आवाहन करण्यात आले.
फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनिप्रदूषण, पक्षी आणि प्राण्यांवर होणारे दुष्परिणाम, तसेच मानवी आरोग्याला निर्माण होणारे धोके याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. पर्यावरणपूरक आणि सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
—