नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली.
विद्यार्थ्यांनी ध्वनिप्रदूषण, प्लास्टिकचे दुष्परिणाम आणि रस्ते सुरक्षा या विषयांवर पथनाट्ये सादर केली. अनावश्यक हॉर्न वाजवू नका, प्लास्टिकचा वापर टाळा आणि वाहतुकीचे नियम पाळा, असे महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी आपल्या अभिनयातून दिले.
विद्यार्थ्यांनी उत्तम सांघिक भावना, समन्वय आणि आत्मविश्वास दाखवत पथनाट्यांचे सादरीकरण अतिशय उत्साहपूर्ण व प्रभावी केले. त्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले तसेच त्यांच्या प्रयत्नांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ अभिनय कौशल्यच नव्हे, तर सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणाही दिली.
—
सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती
Get real time updates directly on you device, subscribe now.