अशोका महाविद्यालयात ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथपालांचा सत्कार

0

नाशिक : प्रतिनिधी
येथील अशोका एज्युकेशन्स फाउंडेशन उच्च शिक्षण विभागातर्फे पद्मश्री डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रंथपालाचे शैक्षणिक क्षेत्रातील दिले जाणारे उल्लेखनीय सेवाकार्य आणि विद्यादानामध्ये करत असलेले योगदान या कार्याचा सन्मान म्हणून महाविद्यालयांच्यावतीने ग्रंथपालांच्या सत्कार समारंभाचे आयोजन संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.
या निमित्ताने नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रातील ग्रंथपालांचा सन्मान पत्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभासाठी एचपीटी आणि आरवायके महाविद्यालयांचे ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जयंत नंदागवळी यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. नंदागवळी यांनी सध्याच्या एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) युगातील ग्रंथपालाच्या भूमिका आणि आव्हाने, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि माहितीची विश्वासाहर्ता यावर भाष्य केले.
यावेळी नाशिक शहरातील विविध महाविद्यालय आणि अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयातील ग्रंथपाल असे ३० ग्रंथपालांचा प्रमुख अतिथीच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी ग्रंथालयांचे आधुनिक स्वरूप, वाचनाचे महत्व, काळानुसार ग्रंथपालांनी आधुनिक कार्यपद्धतीचा स्वीकार याविषयी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन एईएफ-एचई अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. प्रीती सोनार, एबीएसचे संचालक डॉ. सुनील डोके, एसीबीसीएसच्या प्रभारी प्राचार्या डॉ. हर्षा पाटील, एआयसीईएसआरच्या प्रभारी प्राचार्या डॉ. सरिता वर्मा आणि एसीईच्या प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल डॉ. अंजना भंडारी, मोहन निकुंभ, अक्षय आव्हाड आणि स्वप्नाली कासार यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या उच्च शिक्षण महाविद्यालयांमधील विद्यार्थिनी माहीन शेख आणि रेवती जाधव यांनी केले. आरती संतोष यांनी आभार मानले.
कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया, व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया आणि सचिव श्रीकांत शुक्ला यांनी शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.