नाशिक : प्रतिनिधी
येथील के. व्ही. एन. नाईक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) थॅलेसेमिया याबद्दल जनजागृती करण्याच्या हेतूने कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले होते. जनकल्याण ब्लड बँकेच्या विश्वस्त विद्या पोळ या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे यांनी भूषविले. जेष्ठ्य समाजसेवक सतीश पाटील यांनी थॅलेसिमिया या विषयावर उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. थॅलेसिमिया म्हणजे काय?, तसेच भारतात थॅलेसेमिया मेजर आणि मायनर यामधील फरक त्यांनी यावेळी स्पष्ट केला.
विद्या पोळ यांनी सांगितले की, विवाहपूर्वी प्रत्येक मुलगा व मुलगी यांनी थॅलेसिमियाची तपासणी करणे गरजेचे आहे, जर दोघांमध्ये थॅलेसेमिया जर कुणाला मायनर असेल तर त्याच्याशी विवाह करू नये. शक्यतो आपल्याच नात्यांमध्ये विवाह करण्याची टाळावे. तसेच थॅलेसिमियाची तपासणी सरकारने पूर्णपणे मोफत केलेली आहे. विवाहापूर्वी पत्रिका जुळविण्याअगोदर थॅलेसिमियाची चाचणी ही अत्यंत आवश्यक आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले
यावेळी जनकल्याण रक्तपेढीतर्फे आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.
यावेळी मंचावर आयटीआयची प्राचार्य नितीन काळे, तसेच गटनिदेशक साहेबराव हेंबाडे, गटनिदेशक उमेश पालवे व निदेशक दीपक साळवे, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, महेश बोडके, गोकुळ बेदाडे, अजय पवार, योगेश गांगोडे, सुशील लोहकरे, मोहन पवार आदी कर्मचारी उपस्थित होते.
—