नाशिक : प्रतिनिधी
डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन यांच्यातर्फे तापी पूर्णा उत्कृष्ट समाजसेवक राष्ट्रीय पुरस्कार येथील डॉ. प्रीती कृष्णा शहाणे यांना प्रदान करण्यात आला आहे. त्रंबकेश्वर येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनात त्यांना हा पुरस्कार डॉ. शिवचरण उज्जैनकर, प्रा. डॉ. सुभाष बागल, डॉ. रमाकांत जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला. त्यांनी हा पुरस्कार प्रतिनिधीमार्फत स्वीकारला.
त्यांच्या या बहुआयामी कामगिरीबद्दल आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ यांच्यावतीने नॅशनल एक्सलन्स अँवार्ड, तसेच राष्ट्रीय माणुसकी पुरस्कार अशा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने त्या यापूर्वी सन्मानित झाल्या आहेत.
—