आंबे खाण्याच्या स्पर्धेस विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

0

नाशिक  : प्रतिनिधी
श्री कालिका देवी मंदिर ट्रस्ट, नाशिक आयोजित आंबा महोत्सवानिमित्त आंबे खाण्याची स्पर्धा रविवारी (दि. 24 मे) कालिका मंदिर येथील सभागृहात झाली. यात तीन गटांमध्ये स्पर्धा झाली. १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना वेळ देऊन आंबे खाण्याचे स्पर्धा भरवण्यात आली.
या स्पर्धेत १ली ते ४थी वयोगट –
प्रणील सुशील कोरडे (प्रथम), गौरी सचिन हेकरे (द्वितीय), तुषार शिवदास चव्हाण (तृतीय), विहा भरत पाटील (उत्तेजनार्थ).

५ वी ते ७ वी वयोगट
श्याम राजेश कुमार जयस्वाल (प्रथम), साई विनोद मराठे (द्वितीय), भक्ती नारायण दौंड (तृतीय), अथर्व राजेंद्र शेळके (उत्तेजनार्थ), उमेश योगेश कुलकर्णी (उत्तेजनार्थ).
८ वी ते १०वी वयोगट –
वीर भरत पाटील (प्रथम), अर्जुन राम पाटील (द्वितीय), चैतन्य कोरडे (तृतीय).

  अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांना आंबा महोत्सवानिमित्त आंबे खाण्याच्या स्पर्धेला शुभेच्छा देऊन स्पर्धेची सुरुवात केली. स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले. सुनील बिरारी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी भरत पाटील, दीपिका पाटील, कांचन पाटील, राजेश शेळके, राजू शिंदे, पांडुरंग माडोकर, कुणाल घाणे, पवन पवार आदींनी परिश्रम घेतले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.