नाशिक : प्रतिनिधी
शरणपूर रोड येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये धुमाळ इंडस्ट्रीज (आशेवाडी, ता. दिंडोरी) यांच्यातर्फे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रोजगारविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बुधवारी (दि. 3 जून) हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिवीर वसंतराव नाईक व स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. आशेवाडीचे माजी सरपंच संजय बोडके व धुमाळ इंडस्ट्रीजचे एचआर मॅनेजर जगदीश पाटील यांचा सत्कार आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे यांनी केला. धुमाळ इंडस्ट्रीजचे असिस्टंट मॅनेजर गजेंद्र पाचे व एचआर मॅनेजर प्रसाद मुर्तडक यांचा सत्कार गटनिदेशक उमेश पालवे यांनी केला.
प्राचार्य काळे यांनी प्रास्ताविकात रोजगाराविषयी आयटीआयचे प्रशिक्षणार्थी नाशिक तसे नाशिकच्या बाहेर विविध एमआयडीसीमध्ये कंपन्यांमध्ये काम करत असल्याचे सांगितले. व्यवस्थापक जगदीश पाटील यांनी प्रशिक्षणार्थ्यांना धुमाळ इंडस्ट्रीजचे विविध बारकावे व कुक्कुटपालनाविषयी विस्तृत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कुक्कुटपालनामध्ये धुमाळ इंडस्ट्रीजमध्ये आधुनिक सुधारणा करून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध केले आहेत.
निदेशक आनंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. गटनिदेशक उमेश पालवे यांनी आभार मानले. यावेळी निदेशक दीपक साळवे, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, अजय पवार, योगेश गांगोडे, मोहन पवार, सोनाली खिराडी, संदीप काजळे, सुशील लोहकरे, भारती नागरे, अमोल नागरे आदी कर्मचारी उपस्थित होते.
—