जि. प. शाळा, तळेगाव येथे वह्या वाटप 

0

नाशिक  : प्रतिनिधी
जि. प. शाळा, तळेगाव (ता. दिंडोरी) येथे श्री. राहुल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त तुला केलेल्या वह्यांचे वाटप डी एस एफ यांच्यावतीने करण्यात आले. सोनाली चारोस्कर, सरपंच, अशोक दुधारे, अशोक कदम, दीपक निकम, ज्योती निकम, अविनाश ढोली, विजया दुधारे, माजी सरपंच अजय चारोस्कर यांचे हस्ते 160 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. त्याच वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या विविध झाडांच्या बियांचे संकलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कांतीलाल भरसट, शाळेतील शिक्षकवृंद धनंजय आहेर, अशोक देवरे, पुष्पा जगताप, कुंदा निकम, माधुरी थोरात, ज्योती अहिरे, पल्लवी गांगोडे, रोहिणी परदेशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.