चितेगाव फाटा येथे नवचंडी महायज्ञ उत्साहात संपन्न; विश्वकल्याण व हिंदू राष्ट्रासाठी प्रार्थना

0

नाशिक : प्रतिनिधी
​श्री क्षेत्र चांदोरी (चितेगाव फाटा) येथील श्री दत्त गो सेवा संस्थानच्या वतीने आचार्य महंत दत्तपीठाधिश्वर  पुरुषोत्तम जोशी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली  नवचंडी महायज्ञ व नवरात्रोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला.

​सदर नवरात्रोत्सव दि. ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या ​उत्सवादरम्यान दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम पार पडला.
​अष्टमीच्या दिवशी समस्त भक्तांच्या कल्याणासाठी नवचंडी महायज्ञ व दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. ​याशिवाय कार्यक्रमात कन्या पूजन देखील करण्यात आले. याप्रसंगी पुरुषोत्तम जोशी महाराजांनी आदिशक्तीकडे समस्त विश्वाचे कल्याण होवो, शेतकरी राजा व प्रजा सुखी होवो आणि हिंदू राष्ट्र बनो, अशी देवीच्या चरणी प्रार्थना केली. ​

या नऊ दिवसीय महोत्सवात विशेष अतिथी म्हणून कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर आव्हाड  तसेच विलास गाडे, कैलास टर्ले आणि कुलस्वामिनी लॉन्सचे संचालक तानाजी टर्ले, सरपंच विनायक खरात,​उपसरपंच मोनिका टर्ले, संदीप टर्ले, शरद नाठे, मंदिराचे पुजारी संचित जोशी, निखील नाठे, गणेश टर्ले, समाधान गोराडे, समाधान नाठे, सुभाष गोहाड, नाना लोखंडे, रतन नाठे आदींसह अनेक प्रमुख मान्यवर आणि भाविक उपस्थित होते.
​–

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.