नाशिक : प्रतिनिधी
येथील विद्या सेवा संस्था प्रणित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात नाशिक महानगरपालिका व क्रिएटिव कुटीर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून आकर्षक व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले.
याप्रसंगी विद्या सेवा संस्थेचे संस्थापक सचिव तथा मुख्याध्यापक गणेश पिंगळे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रणित पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला असून उपस्थितांनी उपक्रमाचे स्वागत केले.
—