प्रणित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती

0

नाशिक : प्रतिनिधी
येथील विद्या सेवा संस्था प्रणित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, झेब्रा क्रॉसिंगचा योग्य उपयोग तसेच रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनात सुरक्षित वाहतुकीचे महत्त्वही यावेळी पटवून देण्यात आले.
याप्रसंगी विद्या सेवा संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा पिंगळे, संस्थापक सचिव तथा मुख्याध्यापक गणेश पिंगळे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रणित पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या सदस्यांनी प्रात्यक्षिके व संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण केली. कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.