युवा महोत्सवात अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशन स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर अशोका बी.एड. कॉलेजचा दैदिप्यमान विजय

0

नाशिक : प्रतिनिधी
एसएनडीटी वूमन्स युनिव्हर्सिटी, मुंबईच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित उत्तर महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सवाचे आयोजन 30–31 ऑगस्ट 2026 रोजी तुळशी कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग, बीड जिल्हा येथे नुकतेच करण्यात आले.
या युवा महोत्सवात अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशन स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर अशोका बी.एड. कॉलेजच्या विद्यार्थिनींनी  साहित्यिक, सांस्कृतिक आणि कलात्मक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विविध विभागांत एकूण 18 पारितोषिके पटकावली. तसेच, संस्थेने प्रतिष्ठेचे उपविजेतेपद मिळवले आणि साहित्यिक स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट विजेतेपद प्राप्त केले. या उल्लेखनीय यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक लौकिकात मानाची भर पडली आहे.

अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशन स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या विद्यार्थिनींच्या या उत्कृष्ट कामगिरीचे अशोका एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रीती सोनार, प्रभारी प्राचार्या  डॉ. सरिता वर्मा,  सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सविता शिंदे तसेच सर्व प्राध्यापकांनी कौतुक करून सहभागी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.