नाशिक : प्रतिनिधी
मोटार वाहन विभाग (आर.टी.ओ.) कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीत उपसचिवपदी पुनित रमेश जाधव यांची निवड झाली. जाधव हे सध्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव येथे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत.
मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या नाशिक विभागातील नवीन कार्यकारिणीच्या निवडीसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर राज्यस्तरीय कार्यकारिणीसाठी नावे पाठविण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये पुनित रमेश जाधव, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव यांचे नाव राज्य कार्यकारिणीतील पदासाठी पाठविण्यात आले होते.
जाधव यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या उपसचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने मालेगाव, तसेच नाशिक जिल्ह्यातील सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कार्यक्षम नेतृत्व, सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि संघटनात्मक कामाची जाण या गुणांच्या बळावर ते संघटनेची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल सहकारी कर्मचारी, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संघटनात्मक जबाबदारीला न्याय देत कर्मचारी हितासाठी प्रभावीपणे कार्य करू, अशी अपेक्षा त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
पुनित यांच्या निवडीने नाशिक जिल्हा व मालेगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी सर्वत्र व सुनिल जाधव, पुणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
—
पुनित जाधव यांची महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या उपसचिवपदी निवड
Get real time updates directly on you device, subscribe now.