अश्विननगर, सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये कृतज्ञता उपक्रम

0

नाशिक  : प्रतिनिधी
सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक व भावनिक अध्ययन या अंतर्गत कृतज्ञता उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी वेब चार्ट तयार करून आपल्या जीवनातील ज्या व्यक्ती, वस्तू आणि अनुभवांबद्दल ते कृतज्ञ आहेत, त्यांची नोंद केली. या सर्जनशील कृतीतून विद्यार्थ्यांना आपल्या भावना ओळखणे, सकारात्मक विचार करणे तसेच त्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करणे यांचे महत्त्व समजले.
आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचे महत्त्व जाणून घेणे, आपल्या सभोवतालच्या व्यक्तींचे योगदान ओळखणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या आनंददायी आणि अर्थपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञतेची भावना, सकारात्मक दृष्टिकोन आणि भावनिक जाणीव विकसित होण्यास मदत झाली. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच प्रेम, आदर आणि आभार व्यक्त करण्याची सुंदर सवयही जोपासली जात आहे.
—

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.