पुस्तके वाचल्याने जीवनाचे सोने होते : प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे

0

नाशिक : प्रतिनिधी
पुस्तके वाचणारा माणूस कधीच एकटा नसतो. त्याच्या सोबतीला हजारो विचारवंत असतात. अशी पुस्तके वाचल्याने जीवनाचे सोने होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी येथे केले.
गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित आर.एन.सी. आर्ट्स जे.डी.बी. कॉमर्स ॲण्ड एन.एस.सी.सायन्स कॉलेज (बिटको) महाविद्यालयात  भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा झाला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
ग्रंथालय विभागाच्यावतीने अवांतर वाचन व स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट दिली. यावेळी उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर त्यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. प्रा. डॉ. नागरगोजे, प्रा. डॉ. करमाळकर, प्रा. क्षीरसागर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य राधा पाटील यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद केले. यावेळी विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे स्वयंरचित कवितांचे वाचन केले.
ग्रंथपाल चंद्रात्रे यांनी सूत्रसंचालन केले. माळवे यांनी आभार मानले.
—

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.