नाशिक : प्रतिनिधी
सेवानिवृत्त मुख्याध्यापकांजवळ समृद्ध अनुभव असतो. त्यांनी त्याच्या अनुभवाचा लाभ नवीन मुख्याध्यापकांना करून द्यावा. म्हणजे नव्या मुख्याध्यापकांचे एक प्रकारे प्रशिक्षण होईल. माजी मुख्याध्यापक संघाने हे कार्य हाती घ्यावे असे उद्गार ना. ए. सोसायटीचे व सावानाचे अध्यक्ष दिलीप फडके यांनी काढले.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाने आयोजित शिक्षण जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना प्रमुख पाहुणे म्हणून फडके बोलत होते. सारडा कन्या विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

याप्रसंगी माजी शिक्षण संचालक भालचंद्र देसले यांनी संघाच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले. शिक्षणाच्या क्षेत्रात अपप्रवृत्ती असू नयेत, कारण समाजात शिक्षक, गुरूंना आदराचे स्थान आहे. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढते.
कला, क्रीडा, शिक्षण, विज्ञान क्षेत्रात ज्या मुख्याध्यापकांनी उत्कृष्ट कार्य केले, पण ज्यांची दखल घेतली गेली नाही अशा मुख्याध्यापक – मुख्याध्यापिकांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, ज्ञानेश्वरी व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

अध्यक्ष प्रा. प्र. द. कुलकर्णी यांनी मुख्याध्यापकांच्या सुरूवातीच्या समस्या व ध्येयपूर्तीचा आनंद याबद्दल विचार मांडले.
पुरस्कारार्थींतर्फे रविंद्र मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी मुख्याध्यापक रमेश देशमुख यांनी संघाला पाच हजार रुपयांची देणगी दिली. सु. मो. भावसार यांनी सत्कारार्थींचा परिचय करून दिला. सचिव पी. बी. हिंगमिरे यांनी सूत्रसंचालन केले. ई. के. कांगणे व के. मा. मोरे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.या सोहळ्यासाठी सा. कुसुमाग्रज नगरचा पुरस्कारार्थीच्या परिचयाचा खास रंगीत अंक नागवंशी यांनी वितरीत केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाजन, सुभाष टिळे, ठोके, उत्तम आहिरे, के. एन. फड यांनी परिश्रम घेतले.
यांचा गौरव करण्यात आला
माधव आहेर, रविंद्र मोरे, वसंत गोवर्धने, एस. एन. वाघ, पर्वत सावकार, बाळासाहेब सूर्यवंशी, कुंदा जोशी, प्रभाकर होनराव, विद्या धात्रक.
—