‘विकसित भारत आणि शाश्वततेचा पाया म्हणून भारतीय ज्ञानप्रणाली’ या दोन दिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन

0

नाशिक  : प्रतिनिधी
अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या एआयसीईएसआर महाविद्यालय व एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई शिक्षण विभागाच्या विद्यमाने `शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची विकसित भारत आणि शाश्वततेचा पाया म्हणून भारतीय ज्ञानप्रणालीʼया विषयावर दिनांक 28 व 29 एप्रिल 2026 या दोन दिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले.

प्रभारी प्राचार्या डॉ. सरिता वर्मा यांनी स्वागत केले. डॉ प्रज्ञा वाकपैंजन (शिक्षण विभाग प्रमुख, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई) यांनी राष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक सादर केले. परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रो.रुबी ओझा (प्र-कुलगुरू, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती राहून, `२०४७ पर्यंतच्या कालखंडात समृद्ध पर्यावरणीय संवर्धनावर आमचा दृढ विश्वास आहे. नैतिक नेतृत्व आणि दीर्घकालीन वचनबद्धतेच्या जोरावरच आपण ‘विकसित भारत’ हे ध्येय गाठू शकतो,” असे विचार व्यक्त केले.
राष्ट्रीय परिषदेत प्रमुख वक्ते डॉ सिबिल थॉमस (प्राचार्य, सेंट अँड्र्यूज कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई), डॉ. प्रा. मंदार भानुशे (विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा प्रमुख, दूर व मुक्त अध्ययन संस्था, मुंबई विद्यापीठ), डॉ.सुनील राजपूरकर (के. के. कॉलेज ऑफ एज्युकेशन मुंबई) यांचे भारतीय ज्ञान प्रणालीच्या महत्त्वावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.
राष्ट्रीय परिषदेत एकूण 4 तंत्रज्ञान विषयक सत्र घेण्यात आले असून त्यात 170 हून अधिक सहभागींनी आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, नाशिक, पुणे, मुंबई, कल्याण, धुळे अशा अनेक राष्ट्रीय स्तरातून सक्रिय सहभाग नोंदवला. राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रास प्रमुख अतिथी डॉ. मीना कुटे (संचालिका, एस.एस.आर. कॉलेज ऑफ एज्युकेशन, सिलवासा) यांच्या उपस्थितीत झाला. त्यांनी आपल्या समारोप भाषणात भारतीय ज्ञानाची भविष्यातील गरज अधोरेखित केली.
राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल `एईएफʼचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला आणि प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी एआयसीईएसआर टीम आणि सर्व सहभागींचे अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या आयक्यूएसी आणि कोर्स समन्वयक डॉ. प्रिती सोनार यांनी परिषदेचे अहवाल वाचन व परिषदेच्या मुख्य समन्वयक प्रा. समृद्धी चेपे यांनी आभार मानले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी यांनी राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी समर्पितपणे काम करत प्रत्येक सत्र प्रभावी आणि लाभदायक बनवले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.