युडब्ल्यूसीईसीमध्ये संत सेंट लॉरेन्स यांचा विशेष उत्सव श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा

0

नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर सिडको येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये शाळेचे संरक्षक संत सेंट लॉरेन्स यांचा विशेष उत्सव श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. १० ऑगस्टला हा कार्यक्रम झाला.

या निमित्ताने सेंट लॉरेन्स यांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपूर्ण पॉवरपॉईंट सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आनंददायी रंगभरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळेची चित्रे आकर्षक रंगांनी सजवून ती चित्रे आपल्या घरी नेली.
हा दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंद, सर्जनशीलता आणि ज्ञानाने परिपूर्ण ठरला. सेंट लॉरेन्स यांनी दिलेली दयाळूपणा, प्रामाणिकपणा आणि प्रेमाची मूल्ये आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. या मूल्यांमधून विद्यार्थ्यांना संवेदनशील, जबाबदार आणि प्रेमळ व्यक्ती म्हणून घडण्याची प्रेरणा मिळते.
सेंट लॉरेन्स यांच्या प्रेरणादायी जीवनमूल्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचे आचरण करावे, हीच या विशेष दिनाची प्रेरणा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.