सप्तशृंगी नागरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

0

नाशिक : प्रतिनिधी
दिंडोरीरोडवरील मेरी येथील सप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच झाली. या सभेत सभासदांना ११ टक्के लाभांश देण्याबाबत घोषणा संस्थापक अध्यक्ष सुभाष काकड यांनी केली.
म्हसरूल स्थित स्वामी विवेकानगरमधील श्रद्धा नागरिक हॉलमध्ये ही सभा झाली. पतसंस्थेचे सचिव अरुण म्हस्के यांनी पतसंस्थेच्या आर्थिक पत्रकांचे वाचन केले व सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. संस्थेचे सभासद व विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते यांचा संस्थापक अध्यक्ष सुभाष काकड यांनी संस्थेच्यावतीने सत्कार केला. याप्रसंगी उपाध्यक्ष ॲड. राजाराम लोहकरे, अरुण म्हस्के यांनी मनोगत व्यक्त केले.

आमदार गोकुळ गीते यांनी संस्थेच्या पारदर्शी कामकाजाबद्दल गौरवोद्गार काढले व संस्थेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संस्थेच्या संचालिका दिपाली गीते यांची महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विक्रमी मतांनी निवड झाली, त्याबद्दल संस्थेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या कर्जदार सभासदांचा सत्कार करून संस्थेने चांगली प्रथा सुरू केली, असे मत संस्थेचे ज्येष्ठ्य सदस्य पंडितराव कुमावत यांनी व्यक्त केले.
संचालक अविनाश दरगोडे, सुरेश चव्हाण एस. यू. पाटील, सविता म्हस्के उपस्थित होते. संचालक राहुल पवार यांनी सूत्रसंचालन केले. संचालक डी. आर. पाटील यांनी आभार मानले. सभा यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे व्यवस्थापक अमोल सूर्यवंशी व कर्मचारीवर्ग यांनी परिश्रम घेतले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.