शालेय व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी राहुल बडवर

0

नाशिक : प्रतिनिधी
वाकद (शिरवाडे) येथे शालेय व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी राहुल बाळासाहेब बडवर यांची निवड झाली. शालेय व्यवस्थापन मंडळ समिती निवडीसह पालक मेळावा पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष गणेश गायकवाड यांच्यासह मुख्याध्यापक अनिल ससाणे उपस्थित होते. व्यवस्थापन मंडळ कार्यकारिणीत सागर पवार (उपाध्यक्ष), चित्रा बडवर, अर्चना जेजुरकर, नंदा गायकवाड, आशा पवार, अनिता भवर, दीपक व्यापारी, राजेंद्र भवर, विलास सोनवणे, सतीश गायकवाड, शहानवाज सय्यद, गणेश कमोदकर यांचा समावेश आहे. याप्रसंगी सोमनाथ चोरे, ज्योती पालवे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.