विद्योत्तमा फाउंडेशनतर्फे बुधवारी ‘राखी की अदाएं गुलजार की सदाएं’  संगीतमय कार्यक्रम 

0

नाशिक : प्रतिनिधी

विद्योत्तमा फाउंडेशन द्वारे ‘सुबोध मिश्रा प्रेझेंट्स’ अंतर्गत  या  ‘राखी की अदाएं – गुलजार की सदाएं’ या विशेष संकल्पनेवर आधारित हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गाण्यांचा संगीतमय मैफिलीचे  बुधवारी (दि.१९) सायंकाळी ५.३० वाजता, गंगापूर रोड येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान मध्ये आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना  सुबोध कुमार मिश्र यांची असून श्रद्धा शिंदे व ज्योती नाफडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन व गायन केले आहे. ​या शिवाय संगीतमय मैफिलीत प्रसिद्ध गायक
रंजना महाजन, अनुराधा गावंडे, संगिता चौंडेकर, विजया जाधव, डॉ. सुनंदा मोरे, रामचंद्र कुलकर्णी, उदय जोशी, संजय सिंह, संजय देवपूरकर, सुरेश मानकर, अनिल खैरनार, प्रविण पाटील, किरण देशमुख आणि संजय भंडारी हे कलाकार गायन करणार आहेत. सर्व नाशिककर ​संगीतप्रेमी नागरिकांसाठी हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य  असून जास्तीत जास्त नागरिकांनी व संगीत रसिकांनी या संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.