नाशिक : प्रतिनिधी
वर्धिष्णु एज्युकेशन सोसायटी संचलित आरंभ पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक डे उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या संचालिका अस्मिता मोगल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध खेळांची ओळख करून देण्यात आली. यामध्ये फुटबॉल, फुटसाल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, फेन्सिंग, बुद्धिबळ (चेस), तसेच सेपाक टकरॉ आदी खेळांचे साहित्य प्रत्यक्ष दाखवून त्यांचा उपयोग, नियम व वैशिष्ट्यांविषयी माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांना खेळांचे साहित्य ओळखण्यास प्रोत्साहित करण्यात आले तसेच त्यांना विविध प्रश्न विचारून सहभागात्मक पद्धतीने शिक्षण देण्यात आले. ज्या खेळांची माहिती मुलांना नव्हती, त्या खेळांविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, निरीक्षण क्षमता, सामान्य ज्ञान आणि नवीन खेळांविषयी उत्सुकता निर्माण झाली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षिका सुचिता गीते, मंजिरी चौधरी, शारदा सूर्यवंशी आणि विद्या आव्हाड यांनी विशेष सहकार्य केले.
—