नाशिक : प्रतिनिधी
श्री कालिका देवी मंदिर संस्थान, यशवंत व्यायामशाळा क्रीडा संस्कृती फाउंडेशन व दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 23 ते 30 जून 2026 दरम्यान ऑलिंपिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कालिका मंदिर येथे जिल्हा जंपरोप अजिंक्य स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती पुरस्कार विजेते जय शर्मा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री कालीका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून अशोक दुधारे, दीपक निकम, शैलेश रकिबे, समन्वयक अविनाश ढोली उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तन्मय कर्णिक, शैलेश रकिबे, भूषण बटाटे, नमन गंगवाल, राजू लुंकड आदी प्रयत्नशील आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश रकिबे यांनी केले. प्रास्तविक दीपक निकम यांनी केले. जय शर्मा यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष स्थानावरून बोलताना अण्णासाहेब पाटील यांनी खेळाडूंनी संधीचं सोनं करावे. देशाचे, जिल्ह्याचे नाव उज्वल करावे असे सांगून सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे
—
मुले – ३० सेकंड स्पीड : श्रीराज रोड – आदर्श स्कूल-गोल्ड, रुद्र गायकवाड – रचना विद्यालय-सिल्वर,अझान सैय्यद – रयान इंटरनेशनल – ब्राँझ
—
३ मिनिट एंडूरन्स : देवांश कुमट- फ्रावशी अकॅडमी – गोल्ड, मोहिउद्दीन खाटीक – सेंट लॉरेन्स हाई स्कूल – सिल्वर, अली आसिफ गाडीवान – ब्राँझ
—
डबल अंडर : सर्वज्ञ सोळंखे – आदर्श स्कूल – गोल्ड,
श्लोक मगर – सेंट लॉरेन्स हाई स्कूल – सिल्वर, मुकुल चौधरी – सेंट लॉरेन्स हाईस्कूल
फ्रीस्टाइल : ओजस झाडे -षनिर्मला कन्वेंशन – गोल्ड,
सर्वज्ञ गोसावी – रयान इंटरनेशनल – सिल्वर, अथर्व सिंग – रयान इंटरनेशनल – ब्राँझ
—
मुली – ३० सेकंड स्पीड : विभावरी बगुरे – रयान इंटरनेशनल – गोल्ड, मायरा सय्यद – रयान इंटरनॅशनल – सिल्वर, ओवी कराडे – रयान इंटरनॅशनल – ब्राँझ
—
३ मिनिट एंडूरन्स : आस्था कोठारी – न्यू ऐरा स्कूल – गोल्ड, ज्ञानदा घुले – रयान इंटरनॅशनल – सिल्वर, स्वरा पुंड – रयान इंटरनॅशनल – ब्राँझ.
—
डबल अंडर : मैत्री नेवसे – एस्पालियर हेरिटेज – गोल्ड,
—
फ्रीस्टाइल : चाणाक्षी बोहे – रयान इंटरनॅशनल – गोल्ड.
—