युडब्ल्यूसीईसीमध्ये स्थानवाचक संकल्पनांचा आनंददायी अभ्यास

0

नाशिक  : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको, नाशिक येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये “आपल्या आजूबाजूचे स्थान ओळखूया!” उपक्रम झाला.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानवाचक संकल्पना जसे की, आत–बाहेर, ,वर – खाली, डावे – उजवे, वरचा – खालचा – मधला समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. या संकल्पनांमुळे मुलांची निरीक्षणशक्ती, ऐकण्याची क्षमता, संवादकौशल्य तसेच गणित व भाषेची प्रारंभिक समज अधिक विकसित झाली.
युडब्ल्यूसीईसीमध्ये विद्यार्थ्यांनी खेळत – शिकत विविध उपक्रमांद्वारे या संकल्पना आत्मसात केल्या. खेळणी, ब्लॉक्स, खुर्च्या, चेंडू आणि वर्गातील इतर शैक्षणिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी विविध स्थानवाचक संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तसेच, त्यांनी कार्यपत्रिका उत्साहाने पूर्ण केल्या आणि डायरेक्शन गेममध्ये सहभागी होत दिलेल्या सूचनांनुसार योग्य कृती करत विविध स्थानांची अचूक ओळख करून घेतली.

खेळावर आधारित शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दैनंदिन संभाषणात व शालेय उपक्रमांमध्ये स्थानवाचक शब्दांचा आत्मविश्वासाने वापर करण्यास सुरुवात केली. या उपक्रमांमुळे मुलांची सूचनांचे पालन करण्याची क्षमता, विचारशक्ती आणि आत्मविश्वास अधिक बळकट झाला.
युडब्ल्यूसीईसीमध्ये मुलांना खेळ, अनुभव आणि आनंददायी उपक्रमांच्या माध्यमातून शिकण्याची संधी दिली जाते. त्यामुळे प्रत्येक शैक्षणिक उपक्रम हा मुलांसाठी आनंददायी आणि अर्थपूर्ण शिकण्याचा अनुभव ठरतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.