सेंट लॉरेन्स स्कूलमध्ये आनंदोत्साहात दिवाळी साजरी

0

नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रकाशपर्व दिवाळी मोठ्या उत्साहात, सर्जनशीलतेने आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले आकाशकंदील, तोरणे, माळा तसेच विविध सजावटीच्या वस्तूंचे आकर्षक सादरीकरण केले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पनाशक्तीला आणि कलागुणांना वाव मिळाला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून या उत्सवाची रंगत अधिक वाढवली. त्यांच्या आकर्षक वेशभूषेमुळे शाळेच्या परिसरात उत्सवी आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले.
दिवाळीच्या आनंदोत्सवासोबतच विद्यार्थ्यांना फटाके न फोडण्याचे आवाहन करण्यात आले.

फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनिप्रदूषण, पक्षी आणि प्राण्यांवर होणारे दुष्परिणाम, तसेच मानवी आरोग्याला निर्माण होणारे धोके याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. पर्यावरणपूरक आणि सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
—

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.