नाशिक : प्रतिनिधी
इंडियन फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स (आयफेस) नाशिकतर्फे अभियंता दिन २०२६ आणि आयफेस नाशिकचा स्थापना दिन मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता साजरा करण्यात येणार आहे. हा विशेष सोहळा पाथर्डी फाटा येथील रॅडिसन ब्लू हॉटेल येथे आयोजित करण्यात आला आहे.
अभियांत्रिकी, नवोपक्रम आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव इंजिनिअर विकास रामगुडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित सुधीर तांबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
आयफेस नाशिकचे अध्यक्ष इंजिनिअर रवींद्र व्ही. धनाईत यांनी हा कार्यक्रम वैयक्तिक निमंत्रण म्हणून स्वीकारण्याचे आवाहन करत, “आपली उपस्थिती या सोहळ्याला अधिक अर्थपूर्ण व विशेष बनवेल,” असे सांगितले आहे. सेक्रेटरी इंजिनिअर अमित एम. सानप, खजिनदार इंजिनिअर मेघल डी. पवार तसेच कार्यकारिणी समितीने अभियंते व मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
—