नाशिक : प्रतिनिधी
तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने (शिंदे) प्रथम क्रमांक पटकावला आहे. आता हे विद्यालय जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. ही स्पर्धा भगूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयात गुरूवारी (दि.३ सप्टेंबर) झाली. यात 32 शाळा सहभागी झाल्या होत्या.
श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी `महासागरांचे पुनरुज्जीवन : पिढ्यांचे जतनʼ या विषयावर नाटिका सादर केली होती. विद्यालयाच्या प्राचार्या स्वाती वाळेकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत वेदिका जाधव, क्षितिजा जाधव, वैष्णवी जाधव, भूमिका भिसे, समृद्धी भिसे, आदित्य जाधव, मयूर जाधव, सर्वेश टिळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक शोभा चव्हाण, नीलेश देवरे व किरण गोविंद यांचे मार्गदर्शन लाभले.
—