ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरे यांना समाजवैभव राज्यस्तरीय पुरस्कार

0

नाशिक  : प्रतिनिधी

ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरे यांना समाजवैभव राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. बीएसएफ बहुउद्देशीय संस्था (अमरावती), संत कबीर बहुउद्देशीय संस्था (बुलढाणा) यांच्या संयुक्त विद्यमाने `शब्दांच्या पलीकडेʼ या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयोजक भूषण सरदार यांच्या हस्ते व संमेलन अध्यक्ष अशोक कुमावत, समाजसेविका ज्योती लोहार यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आजीचे हॉटेल येथे झालेल्या राज्यस्तरीय काव्य संमेलनामध्ये टिपरे यांच्या सामाजिक व साहित्यिक सेवेच्या झालेल्या या गौरवाबद्दल मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.