रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाउन व पुष्कर आय हॉस्पिटलतर्फे आयोजित नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद

0

नाशिक  : प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाउन आणि पुष्कर आय (निरामय) हॉस्पिटल, पंचवटी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन दिवसीय मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू व सर्वांसाठी लॅसिक तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण १३१ रुग्णांची यशस्वी नेत्र तपासणी करण्यात आली.
​पंचवटी येथील निरामय हॉस्पिटल (पुष्कर आय), महालक्ष्मी टॉकीज शेजारी आयोजित या शिबिरामध्ये तज्ज्ञ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अमित धांडे, डॉ. कृपा धांडे आणि डॉ. चेतन गायकवाड यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिरादरम्यान नेत्रतपासणी सोबतच मोतीबिंदू, ग्लाकोमा, दृष्टीदोष आणि इतर डोळ्यांच्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले. तसेच गरजू रुग्णांवर सवलतीच्या दरात पुढील उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले
​या सामाजिक उपक्रमाचे प्रकल्प संयोजक माजी अध्यक्ष रोटे. डॉ. अमित धांडे यांनी केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाउनचे अध्यक्ष रोटे. दीपक ढोलकिया, सचिव रोटे. राजेंद्र वर्मा, सहसचिव रोटे. नलीन राजपूत यांच्यासह माजी अध्यक्ष डी. आर. पाटील, चेतन भगत, अवतारसिंग पनफेर, डॉ. सी. आर. नामपूरकर, कापूरे, डॉ. अमोल पुरी, डॉ. अनिल निकम, डॉ. सचिन धांडे, दीपक पवार, हरीश वाघ, अंकुश गवळी आणि पुष्कर आय हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेऊन सक्रिय सहभाग नोंदवला.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सामाजिक भान जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी विशेष कौतुक व आभार व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.