पुरुषोत्तम स्कूलचा मित्रमेळा उत्साहात

गप्पाटप्पा, गाण्यांची मैफल अन् आठवणींना उजाळा

0

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक शिक्षणप्रसारक मंडळाच्या जेल रोड (नाशिक रोड) येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या १९९१ मधील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा चौथा मित्रमेळा त्र्यंबकेश्वर-घोटी रोडवरील अमिगो लेक रिसॉर्ट, अळवंड (ता. त्र्यंबकेश्वर) येथे नुकताच उत्साहात झाला. या वेळी नाशिकसह नाशिक रोड, मालेगाव, टिटवाळा, ठाणे, खारघर, पुणे अशा अनेक ठिकाणांहून मित्र आले होते.
सचिन अंतापूरकर, मिलिंद परदेशी, सुधीर कंटाळे, शरद पोटे, योगेश नाशिककर आणि राजू ठक्कर यांनी सर्व मित्रांना एकत्र करून व्हॉट्‍सॲप ग्रुप तयार केला व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. सुरुवातीला दिवंगत मित्रांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली.
गप्पा, गाण्यांची मैफल, नृत्याची रेलचेल, आठवणींना उजाळा, फोटोसेशन, ओळख-परिचय असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. या वेळी मित्रांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत भरीव मदत करण्याचा व दोन वर्षांतून एकदा सर्व मित्रांनी भेटण्याचा संकल्प करण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.