सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘माझे गोड घर’ या विषयावर आनंददायी अध्ययन

0

नाशिक  : प्रतिनिधी
सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझे गोड घर’ या विषयावर पर्यावरण अभ्यासाचा संवादात्मक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना घराचे महत्त्व, कच्ची व पक्की घरे, घरातील विविध खोल्या तसेच घर स्वच्छ ठेवण्याचे आणि कुटुंबातील सदस्यांना मदत करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना सुरक्षित, प्रेमळ आणि आनंदी घराचे महत्त्व समजावून देणे, तसेच कुटुंब आणि परिसराप्रती जबाबदारीची भावना विकसित करणे हा होता. विद्यार्थ्यांनी उत्साहाने आपल्या घराविषयी माहिती सांगितली. तसेच घरातील त्यांना सर्वाधिक आवडणाऱ्या खोलीबद्दल आत्मविश्वासाने बोलत, ती त्यांना का आवडते हेही सांगितले.
या संवादात्मक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्यात, आत्मविश्वासात आणि अभिव्यक्तीक्षमतेत वाढ झाली. प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीने भरलेले घरच खऱ्या अर्थाने आनंद, सुरक्षितता आणि समाधान देणारे असते, याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, ज्ञानवर्धक आणि संस्मरणीय ठरला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.