नाशिक : प्रतिनिधी
सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण अभ्यास विषयांतर्गत ‘आपले मदतीचे हात’ हा उपक्रम उत्साहात घेण्यात आला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी पोलीस – १००, अग्निशमन दल – १०१, रुग्णवाहिका – १०८ आणि आपत्कालीन सेवा – ११२ या महत्त्वाच्या हेल्पलाइन क्रमांकांची माहिती जाणून घेतली.
विद्यार्थ्यांनी पोलीस, डॉक्टर आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिकृतींच्या साहाय्याने समाजातील विविध सेवाभावी व्यक्तींची भूमिका समजून घेतली. तसेच रुग्णालय, बँक, टपाल कार्यालय, मॉल आणि चित्रपटगृह यांसारख्या परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती घेतली. विविध समाजसेवक त्यांच्या कामासाठी कोणती साधने वापरतात, याविषयीही विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने जाणून घेतले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवकांविषयी आदर, कृतज्ञता आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणे हा होता. आपल्या दैनंदिन जीवनात हे मदतीचे हात आपले जीवन अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुखकर बनवतात, याची जाणीव विद्यार्थ्यांना या कृतीतून प्रभावीपणे झाली.
—
सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘आपले मदतीचे हात’ उपक्रम उत्साहात
Get real time updates directly on you device, subscribe now.