रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनतर्फे ज्येष्ठ्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

0

नाशिक : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊन, कृतार्थ ज्येष्ठ्य नागरिक संघ आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरानगर येथील कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात ६० वर्षांवरील ज्येष्ठ्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
​       या शिबिरामध्ये ६० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. शिबिरादरम्यान रुग्णांची मूलभूत शारीरिक तपासणी, वजन, रक्तदाब, रक्तातील साखर, ईसीजी, तसेच डोळे, दात, स्त्रीरोग, मानसिक तणावविषयक तपासण्या करण्यात आल्या. यासोबतच तज्ज्ञ चिकित्सक यांनी ज्येष्ठ्य नागरिकांना शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.
​या उपक्रमाचे आयोजन शिरीष भालेराव व संघाचे अध्यक्ष पांडे यांनी केले होते. शिबिरात डॉ. अमित धांडे, डॉ. नामपूरकर, डॉ. मनीषा जगताप, डॉ. सुशील आंतुर्लीकर, डॉ. राहुल पाटील आणि डॉ. रोहित मालवे व त्यांच्या वैद्यकीय पथकाने रुग्णांची तपासणी करून वैद्यकीय सल्ला दिला.
शिबिर दरम्यान  डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच ज्येष्ठ्य नागरिक संघाने डॉक्टर जी औषधे त्यांना लिहून देतात ती कोणत्या व्याधीकरिता आहे ते  प्रिसक्रिपशनमध्ये लिहून देण्यास विनंती केली. जेणेकरून त्यांना संबंधित व्याधी कामी योग्य औषध घेणे सोईचे होईल.
​      या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनचे अध्यक्ष दीपक धोळकिया, नलिन राजपूत, नोमान पटेल, राजीव कर्णिक, काशिनाथ देसाई, अवतार सिंग, सलीम बटाडा, चेतन भगत, दिलीप चव्हाण, मनोज काबरा, दिलीप काळे, विनोद तन्ना, सुभाष पगार, मीनल जयस्वाल, चारुशीला खैरनार, शिरीष वाबळे आदी उपस्थित होते.
​–

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.