रोटरी नाशिक मिडटाऊनच्या अध्यक्षपदी दिपक धोळकिया, तर सचिवपदी राजेंद्र वर्मा

0

नाशिक : प्रतिनिधी
रोटरी नाशिक मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा नुकताच झाला. अध्यक्षपदी सेवानिवृत्त प्रमुख न्यायाधीश दिपक  धोळकिया, सचिवपदी राजेंद्र वर्मा आणि सह सचिवपदी नलिन राजपूत यांची निवड झाली. उद्योजक मनोज टिबरीवाला, सहा. प्रांतपाल पराग पाटोदकर, माजी अध्यक्ष जे. जे. पवार, सचिव संपत काबरा, माजी प्रांतपाल भामरे, जिल्हा पदाधिकारी कलंत्री, सुकेनकर, भावना ठक्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माजी अध्यक्ष जे. जे. पवार यांनी वर्षभरात विविध उपक्रमांसाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवराप्रती ऋण व्यक्त करून रोटरी मिडटाऊन मार्फत वर्षभरात अनेक समाजपयोगी कामे करण्याचे समाधान लाभल्याचे नमूद केले.
मावळते सचिव संपत काबरा यांनी गेल्या वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती सादर दिली.

नूतन अध्यक्ष धोळकिया यांनी आगामी वर्षभरात राबविण्यात येणारे विविध प्रकल्प, त्यात पितृ स्मृती वन निर्मितीद्वारे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, शालेय साहित्य वाटप, नवजात बालकांसाठी वेलकम गिफ्ट, जेष्ठ नागरिक व मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार, दहावीच्या विद्यार्थ्यांना विशेष राज आकांक्षा शैक्षणिक ॲप, महिलांच्या सक्षमीकरण कामी मोफत शिवणकाम प्रशिक्षण वर्ग आदी प्राधान्यक्रमाने राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

सचिव राजेंद्र वर्मा यांनी आभार मानले. शिरीष भालेराव व चारुशीला खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. मान्यवरांचा परिचय, डॉ नितीन गडकरी, सलीम बटाडा, अवतारसिंग पनफेर यांनी करून दिला.

नूतन कार्यकारिणीत, चेतन भगत, नोमन पटेल, डॉ. नितीन गडकरी, अवतारसिंग पनफेर, डॉ. नामपूरकर, सलीम बटाडा, डॉ. मनिषा जगताप, दिलीप काळे, दिलीप चव्हाण, डी. आर. पाटील, ॲड. अजय जाधव, सरिता नारंग, शिरीष भालेराव,  डॉ. अमित धांडे, मनोज काबरा, राहुल वरखेडे, राजीव कर्णिक, चारुशीला खैरनार, डॉ. किरण बिरारी, शिरीष वाबळे, मीनल जैस्वाल, विनोद तन्ना, जी. एम. जाधव, महेश दिवटे यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकल्प विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.