एक पेड मा के नाम या अभियानातून क्रांतिवीर नाईक आयटीआयमध्ये पर्यावरण संवर्धनाचा जागर

0

नाशिक : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर राबविण्यात येत असलेल्या एक पेड मा के नाम या अभियानात क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. के. व्ही. एन. नाईक आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयटीआय परिसरात विविध 15 वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी आयटीआयचे गटनिदेशक साहेबराव हेंबाडे, उमेश पालवे, निदेशक दीपक साळवे, आनंद जाधव, मधुकर वाघेरे, संदीप काजळे, महेश बोडके, अजय पवार, योगेश गांगोडे, मोहन पवार, सोनाली खिराडी, सुशील लोहकरे, गोकुळ बेदाडे, तसेच ऑफिस कर्मचारी राहुल सानप, भारती नागरे आणि अमोल नागरे यांनी वृक्षरोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली.

याप्रसंगी इलेक्ट्रिशियन, फिटर, मोटर मेकॅनिक, वेल्डर आणि कोपा ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. प्रत्येकाच्या हस्ते लावले गेलेले रोपटे हे केवळ झाड नसून भावी पिढीला दिलेली हिरवीगार भेट असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.
यावेळी प्राचार्य काळे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वृक्ष हे जीवनाचे आधारस्तंभ आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे जतन करणे, ही काळाची गरज आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.