नाशिक : प्रतिनिधी
सिडकोतील अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये वडिलांचे प्रेम, मार्गदर्शन आणि अखंड पाठबळ यांना मानवंदना देणारा फादर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांसाठी आकर्षक शुभेच्छापत्रे आणि हस्तनिर्मित भेटवस्तू तयार केल्या. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी आपल्या वडिलांसाठी सुपर हिरो असे लिहिलेली विशेष पदके तयार केली.

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकांनी सादर केलेल्या पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनने झाली. यामध्ये मुलांच्या जीवनातील वडिलांचे महत्त्व आणि त्यांची भूमिका समजावून सांगण्यात आली. सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांच्या वडिलांनीही या विशेष कार्यक्रमात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांची शिक्षक आणि वर्गमित्रांशी ओळख करून दिली. यानंतर ‘पिक्शनरी’ या मनोरंजक खेळाचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकांनी उपस्थित पालकांचे आभार मानून हा दिवस संस्मरणीय बनवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच वडील आणि मुलांनी सेल्फी पॉइंटवर छायाचित्रे काढून या आनंददायी क्षणांच्या आठवणी जपल्या.
—