अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या  विद्यार्थ्यांचे यश

0

नाशिक : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एकात्मिक बी.ए. – बी.एड. व बी.एस्सी. – बी.एड. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन या महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून ९४ टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
बी.एस्सी. – बी.एड. अभ्यासक्रम : प्रथम – मारिया शेख (९०.२५ टक्के), द्वितीय – फारिया शेख (८९.७५), तृतीय –  जिगीषा कुलकर्णी (८९.३८), चतुर्थ  – नैरीन पठाण (८९ ), पाचवा – प्रिया चव्हाण (८७.२५).
बी.ए. – बी.एड. अभ्यासक्रम : प्रथम – मृणाल मानकर (८७.५ टक्के), द्वितीय – सुमीरा खान (८७.३३), तृतीय – समृद्धी चिमोटे (८७.१७), चतुर्थ – अदिती सिंग (८४.८३), पाचवा –  भावेश बाविस्कर (८४.१७).

महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी व विद्यापीठ स्तरावर अभ्यासक्रमाचे सुवर्णपदक प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी इलाईट क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रत्येक वर्गातील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश इलाईट क्लब मध्ये केला जातो. या अंतर्गत विद्यार्थ्यांचा संपादणूक स्तर उंचावण्यासाठी विशेष व्याख्याने, माजी विद्यार्थ्यांचे उद्बोधन वर्ग, तसेच सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घेण्यात येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी मेन्टॉरिंग पद्धतीचा परिणामकारक वापर करण्यात येतो.

अशोका एज्युकेशन फॉउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे, प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके, अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. रेखा पाटील व डॉ. स्मिता बोराडे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राची चव्हाण, स्मिता कुलकर्णी व लक्ष्मण राजपूत यांनी परीक्षेचे कामकाज बघितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.