श्री शृंगेरी शंकराचार्य मठात आद्य जगद्गुरु शंकराचार्य जन्मोत्सव भक्तीपूर्ण वातावरणात साजरा

(दिवसभर विविध उपक्रम उत्साहात संपन्न)

0

नाशिक : प्रतिनिधी
    पंचवटीतील श्रीक्षेत्र काळाराम मंदिराच्या परिसरातील श्री शृंगेरी शंकराचार्य मठात आद्य जगद्गुरु शंकराचार्य जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. दिवसभर या ठिकाणी विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  भाजपाचे प्रदेश सरचिटणीस प्रवक्ते लक्ष्मण सावजी, डॉ. संदीप मंडलेचा, तसेच सनातन धर्मातील धर्मपंडित वेद मूर्ती आचार्य आणि अन्य राजकीय आणि सामाजिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती तसेच भावीक दर्शनासाठी उपस्थित होते.
सकाळी विविध धार्मिक उपक्रमांनी जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला. नाशिक येथील प्राचीन व सनातन परंपरा असलेल्या या मठामध्ये शंकराचार्यांच्या जन्मोत्सवानिमित्त पारायण करून विश्वकल्याण आणि जगात सर्वत्र शांतता आणि समृद्धी स्थापत्य करण्याच्या उद्देशाने मठाचे अधिकारी व व्यवस्थापक रामगोपाल अय्यर आणि शेखर अय्यर यांच्या हस्ते संकल्प करण्यात आला. तसेच शंकराचार्य यांच्या मूर्तींची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला. यावेळी महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान आचार्य वेदमूर्ती रवींद्र पैठणे गुरुजी, वेदमूर्ती शांताराम भानोसे, वेदमूर्ती दिनेश गायधनी आदी पुरोहितांनी रुद्राचे पठण शंकराचार्यांच्या मूर्तीचा अभिषेक, लघुरुद्र पूजा, पंचामृत पूजा आदी विधी केले. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी मंत्र पठण केले. नाशिक येथील मठात समाधीस्थ झालेल्या दोन्ही शंकराचार्यांच्या पादुकांचे पूजन यावेळेस झाले.  दरम्यान , सकाळी ८.३० पासून शांतीसाठी, प्रधान संकल्प, श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन, लघुरुद्राभिषेक, बिल्वार्चन, आरती झाली व दुपारी महाप्रसाद वितरण करण्यात आले.  शृंगेरी शंकराचार्य मठाचे व्यवस्थापक राम गोपाल अय्यर व सहकाऱ्यांनी केले आहे.
इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज प्रस्तुत
श्रीशंकराचार्य जयंतीच्या पूर्वसंध्येला श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी रचलेल्या विविध रसाळ आणि भक्तिपूर्ण स्तोत्रांवर आधारित कार्यक्रम “शंकरं भक्तिशंकरम् कार्यक्रम संपन्न झाला. नाशिक येथील श्री शृंगेरी शंकराचार्य मठाला मोठी ऐतिहासिक परंपरा असून साडेतीनशे पेक्षा अधिक वर्षापासून या ठिकाणी जगद्गुरु शंकराचार्य श्री दक्षिणामाय शृंगेरी शारदा पिठाधीश्वर यांच्या पवित्र परंपरेतील दोन महासमाधी आहेत. शृंगेरी शारदा पिठाधीश्वरप सत्ताविसावे श्री शंकराचार्य सच्चिदानंद भारती महास्वामी (दुसरे ) तसेच २८ वे शंकराचार्य अभिनव सच्चिदानंद भारती व २९ वे सचिन शंकराचार्य नरसिंह भारती यांनी या मठात वास्तव्य केले त्यांच्या महासमाधी देखील येथेच आहेत. लोकनाथ तीर्थ महायोग ट्रस्ट श्री  नारायण काका ढेकणे महाराज यांचे शिष्य परिवाराचे सायंकाळी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.